admin – Mokashi Krishi Vikas Pratishthan https://mokashipratishthan.org/wp_mokashi Dadasaheb Mokashi educational Campus, A/p- Rajmachi, Tal- Karad Dist.- Satara- 415 105. (MH) Sat, 03 Feb 2024 17:51:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.3 https://mokashipratishthan.org/wp_mokashi/wp-content/uploads/2015/08/cropped-mkvp-logo-32x32.jpg admin – Mokashi Krishi Vikas Pratishthan https://mokashipratishthan.org/wp_mokashi 32 32 मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक १ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘पुण्याई मल्टीपर्पज हॉल’ शिवणी या ठिकाणी “ऊस खोडवा व्यवस्थापन” (पाचट व हुमणी नियंत्रण) या विषयावरती भव्य शेतकरी मेळावा विविध वक्ते यांच्या उपस्थितीत आणि शेतकरी व विद्यार्थी यांच्या सहभागाने पार पडला. https://mokashipratishthan.org/wp_mokashi/index.php/2024/02/03/mkvp-farmers-gathering-2024/ Sat, 03 Feb 2024 17:50:58 +0000 https://mokashipratishthan.org/wp_mokashi/?p=1167 Read More ...]]> *मोकाशी शैक्षणिक संकुलाचे उपक्रम ग्रामीण भागातील शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी अभिमानास्पद…. श्री. मारुती जाधव*

*गांडूळ शेतकऱ्यांचा खरंच मित्र समजून घ्या….. श्री. विकास देशमुख*

*शेतकऱ्यांनी शेतीमधील ज्ञान आत्मसात करणे काळाची गरज…. डॉ. शांतीकुमार पाटील* 

मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक १ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘पुण्याई मल्टीपर्पज हॉल’ शिवणी या ठिकाणी *”ऊस खोडवा व्यवस्थापन” (पाचट व हुमणी नियंत्रण)* या विषयावरती भव्य शेतकरी मेळावा विविध वक्ते यांच्या उपस्थितीत आणि शेतकरी व विद्यार्थी यांच्या सहभागाने पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख व्याख्याते श्री. मारुती जाधव व डॉ. एस. आर. पाटील यांच्या हस्ते शेतीसाठी उपयुक्त विद्यार्थी निर्मित विविध उत्पादनाच्या प्रदर्शनातील स्टॉलच्या उद्घाटनाने करण्यात आली. यानंतर विविध कंपनी यांनी तयार केलेली शेतीसाठी फायदेशीर अशी उत्पादने प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली होती. यानंतर मुख्य कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व स्व. दादासाहेब मोकाशी यांच्या फोटो पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी महाविद्यालय, कराड चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. आर. पाटील शिवणी, आंबेगाव, अमरापूर, हिंगणगाव, सोहोली, शिवाजीनगर गावचे सरपंच, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत गायन केले. यानंतर डॉ. विश्वजीत मोकाशी यांच्या हस्ते श्री. मारुती जाधव व श्री. विकास देशमुख यांचा स्वागत -सत्कार पुष्प वृक्ष व मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान निर्मित दिनदर्शिका -२०२४ देऊन करण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विलास चौधरी यांनी मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान अंतर्गत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच्या विविध उपक्रमाबाबत माहिती दिली; ज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्विमिंग पूल, अन्न चाचणी प्रयोगशाळा, शेतकऱ्यांसाठी सर्व सोयीनियुक्त माती परीक्षण प्रयोगशाळा, प्रशस्त ग्राउंड त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक इंग्लिश स्पीकिंग लॅब, विविध ग्रंथ, चरित्रे त्याचबरोबर प्रशस्त वसतिगृह व्यवस्था आणि संकुलामार्फत संशोधन, विस्तार आधारित उपक्रम याबाबत थोडक्यात आणि आवश्यक माहिती दिली.

 प्रमुख व्याख्याते कृषी तीर्थ शेतकरी निर्मिती उद्योगाचे संस्थापक अध्यक्ष श्री. मारुती जाधव यांनी आडसाली, सुरू या उसाच्या खोडवा व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये घ्यावयाची काळजी याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले. शेतीमध्ये रासायनिक खतांबरोबर जैविक खतांचाही वापर करून संवर्धित शेती याबद्दल जागृती निर्माण केली आणि उसाचे पाचट याच्या माध्यमातून जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवणे, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. ऊस विषय तज्ञांनी पाचट ठेवण्यासंदर्भातील शेतकऱ्यांमधील गैरसमज जसे की वाळवीचा, उंदराचा, हुमनीचा प्रादुर्भाव याबाबत योग्य अशा उदाहरणांच्या आधारे फायदे तसेच नियंत्रणासाठी उपलब्ध पद्धतींचा शेतकऱ्यानी कटाक्षाने वापर करावा असे संबोधले. 

सन्माननीय उपस्थिती श्री. विकास देशमुख, सेंद्रिय शेतीतज्ञ यांनी शेतीमधील जैविक घटक याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृत व्हावे तसेच गांडूळ हा खरंच शेतकऱ्यांचा मित्र कसा याबाबत माहिती दिली. गांडूळाच्या माध्यमातून उभ्या पिकामध्ये जमिनीची मशागत, तन नियंत्रण, अँटिऑक्सिडंट वैशिष्ट्ये यातून सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढवावा आणि शेतकर्यामधील जास्त हॉर्स पॉवर ट्रॅक्टर वापरण्याच्या चढाओढ आपल्या जमिनीची अवस्था याबद्दल नाराजी व्यक्त केली.

एस. व्ही. ऍग्रो व्यवस्थापक डॉ. शांतीकुमार पाटील यांनी अशिक्षित शेती ही न परवडणारीच असेल याबाबत थोडक्यात मार्गदर्शन केले ज्यामध्ये शेतकऱ्यांनी जमीन कसत असताना महत्वाचे तंत्रज्ञान यावरती अभ्यास करून ती समजून घेणे आणि त्यावर आधारित खर्च करून सर्वाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा असे गौरोउद्गार काढले.

कृषी महाविद्यालय, कराड सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. आर. पाटील यांनी आयोजित कार्यक्रमासाठी संस्थेच्या व्यवस्थापनाचे आभार मानून शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याबाबत सांगितले.  

संस्थेचे सचिव श्री. अभिजीत मोकाशी व उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी यांनी प्रोत्साहन दिले याचबरोबर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी महाविद्यालयामार्फत विविध लाभदायक असे कार्यक्रमाचे नियोजनाबाबत सूचना केल्या; तसेच संचालक श्री. विलास चौधरी यांनी कार्यक्रम सर्वोत्कृष्ट पद्धतीने पार पाडावा यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन केले. यावेळी दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलातील सर्व घटक महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. के. एस. घुटूकडे, डॉ. पी. पी. पाटील, प्रा. एस. ई. जगताप, पवार मॅडम, प्रा. डी. एस. सूर्यवंशी या सर्वांनी सहकार्य केले तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व कार्यक्रमासाठी आवश्यक नियोजन केले. कृषी महाविद्यालयातील ग्रामीण जागृतता  कार्यक्रम अंतर्गत विविध गावांमध्ये कार्यरत कृषीदुत व कृषीकन्या यांनी गाव पातळीवर सर्व शेतकऱ्यांना कार्यक्रमाबाबत कल्पना दिली.

कार्यक्रमाचे आभार अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ए. एस. ढाणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभवी पवार, ऋषिकेश जाधव यांनी केले तर कार्यक्रम समन्वयक म्हणून प्रा. व्ही. व्ही. माने यांनी काम पाहिले.

]]>
नाईकबा विद्यामंदिर बनपुरी याठिकाणी स्व. दादासाहेब मोकाशी यांच्या ७४ व्या जयंती साजरी करण्यात आली यावेळी शिक्षक दालनाचे कोनशिला अनावरण प्रसंगी मान्यवर. https://mokashipratishthan.org/wp_mokashi/index.php/2023/12/06/naikba-vidyamandir-banpuri-here-the-74th-birth-anniversary-of-dadasaheb-mokashi-was-celebrated-on-the-occasion-of-the-unveiling-of-the-cornerstone-of-the-teachers-hall/ Wed, 06 Dec 2023 16:44:31 +0000 https://mokashipratishthan.org/wp_mokashi/?p=1048
]]>
दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये बुधवार दिनांक ६ डिसेंबर, २०२३ रोजी स्व. दादासाहेब उर्फ भगवानराव मोकाशी यांची ७४ वी जयंती आयोजित विविध कार्यक्रमांसह साजरी https://mokashipratishthan.org/wp_mokashi/index.php/2023/12/06/dadasaheb-mokashi-educational-complex-on-wednesday-6th-december-2023-74th-birth-anniversary-of-dadasaheb-mokashi-was-celebrated-with-various-programs-organized/ Wed, 06 Dec 2023 16:38:14 +0000 https://mokashipratishthan.org/wp_mokashi/?p=1032 Read More ...]]> दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये बुधवार दिनांक ६ डिसेंबर, २०२३ रोजी स्व. दादासाहेब उर्फ भगवानराव मोकाशी यांच्या ७४ व्या जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री बाबासाहेब कदमसो संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना तथा अध्यक्ष सातारा जिल्हा दूध संघ, डॉ. सुधीर कुंभार, डॉ. पाटील, लोखंडे सर, पोळ मॅडम, श्री विजय पाटील, मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठानचे सचिव श्री अभिजित मोकाशी, उपाध्यक्ष डॉ. विश्वजित मोकाशी, संचालक श्री विलास चौधरी सर, सर्व घटक महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ८ वी ते १० वी हायस्कूल चे शिक्षक व सहभागी स्पर्धक उपस्थिती होते.

]]>
स्व.दादासाहेब ( भगवानराव ) मोकाशी यांच्या ७४ व्या जयंती निमित्त भव्य वत्कृत्व, निबंध लेखन व चित्रकला स्पर्धा 6 DEC 2023 https://mokashipratishthan.org/wp_mokashi/index.php/2023/12/05/vaktrutva-nibandh-chitrkala-spardha-2023/ Tue, 05 Dec 2023 13:27:45 +0000 https://mokashipratishthan.org/wp_mokashi/?p=997 Read More ...]]> स्व.दादासाहेब ( भगवानराव ) मोकाशी यांच्या ७४ व्या जयंती निमित्त भव्य वत्कृत्व, निबंध लेखन व चित्रकला स्पर्धा, स्पर्धेचा गट इ. ८ वी ते १० वी तरी सर्व स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोदवावा. स्पर्धेचे ठिकाण दादासाहेब मोकाशी एज्युकेशन कॅम्पस राजमाची, ता. कराड, जि. सातारा,  महाराष्ट्र

]]>
दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालय राजमाची मधील माझी विद्यार्थ्यांची MCAER Ph.D. प्रवेश परीक्षेमध्ये घवघवीत यश https://mokashipratishthan.org/wp_mokashi/index.php/2023/11/09/mcaer-ph-d-exam-success/ Thu, 09 Nov 2023 06:41:09 +0000 https://mokashipratishthan.org/wp_mokashi/?p=991 Read More ...]]>

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रवेश पात्रता परीक्षेत अभिमानास्पद कामगिरी.

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत आचार्य पदवी पात्रता परीक्षा-२०२३ घेण्यात आली. यामध्ये दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील माजी विद्यार्थी *अंकुश चौगुले (कृषि हवामानशास्त्र), धनश्री देसाई (कृषि रसायनशास्त्र व माती शास्त्र), प्रा. नितीन पाटील (वनस्पती शास्त्र), तेजस गाडेकर (कृषि जीवशास्त्र), प्रेरणा जगताप (कृषि विस्तार शिक्षण)* यांनी आचार्य पदवी प्रवेश परीक्षेत महाराष्ट्र मध्ये अनुक्रमे *3री, 6वी, 10 वी, 3री व 6वी रँक* प्राप्त केली आहे त्याबद्दल मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव श्री. अभिजीत मोकाशी साहेब, उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी साहेब, संचालक श्री विलास चौधरी साहेब व प्राचार्य डॉ. के. एस. घुटुकडे व इतर घटक महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

]]>
राजमाची कृषी विद्यालयात सेंद्रिय घटक निर्मितीचे प्रात्यक्षिक https://mokashipratishthan.org/wp_mokashi/index.php/2023/11/09/sendiya-ghatak-practicle/ Thu, 09 Nov 2023 06:39:18 +0000 https://mokashipratishthan.org/wp_mokashi/?p=987 दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी https://mokashipratishthan.org/wp_mokashi/index.php/2023/11/01/mpkv-intercollegiate-debate-and-elocution-competition-2023-24/ Wed, 01 Nov 2023 05:05:53 +0000 https://mokashipratishthan.org/wp_mokashi/?p=983 Read More ...]]> महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी सलग्न व मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी के के वाघ कृषी महाविद्यालय व इतर घटक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेमध्ये *वैभवी पवार, सिद्धेश दरेकर, सानिका पवार, कृष्णाजी जाधव, सुजय इंगवले, शिवम शिंदे, विशाल पाटील, क्षितिज जाधव, सिद्धी गायकवाड, राजवर्धन देवकर* या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून विविध विषयावरती सर्वोत्कृष्ट माहितीद्वारे लक्षवेधून घेतले.

आयोजित आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा २०२३-२०२४ मध्ये *वैभवी शिवाजी पवार* या विद्यार्थिनीने लोकसंख्या व पर्यावरण या वादविवाद विषयावरती तसेच भारतीय लोकशाही या वक्तृत्व स्पर्धेमध्ये *द्वितीय पारितोषिक* पटकावले तसेच *इतर विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र* देऊन गौरवण्यात आले याबद्दल मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठानचे सचिव श्री. अभिजीत मोकाशी, उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी, संचालक श्री. विलास चौधरी यांनी अभिनंदन केले तसेच कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. घुटूकडे व इतर घटक महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

]]>
खंडेनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. https://mokashipratishthan.org/wp_mokashi/index.php/2023/10/25/khande-navami-2023/ Wed, 25 Oct 2023 11:14:00 +0000 https://mokashipratishthan.org/wp_mokashi/?p=977 Read More ...]]> दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आज सोमवार दिनांक २३ ऑक्टोबर, २०२३ रोजी सर्व घटक महाविद्यालयांचे प्राचार्य पवार मॅडम, प्रा. ए. एस. ढाणे, डॉ. के. एस. घुटूकडे, डॉ. पी. पी. पाटील, प्रा. एस. इ. जगताप यांच्या उपस्थितीत फिटोपूजन, दीपप्रज्वलन व सर्व उपकरणे तसेच शस्त्रांचे पूजन करण्यात आले. आजच्या या वैशिष्ट्य पूर्ण दिवसाचे महत्व लक्षात घेता संस्थेचे सचिव श्री. अभिजीत मोकाशी, उपाध्यक्ष डॉ. विश्वजित मोकाशी व संचालक श्री. विलास चौधरी यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व खंडेनवमीच्या शुभेच्छा दिल्या.

]]>
On the occasion of World Food Day on 16/10/2023 we organize competitions for all food technology students at Dadasaheb Mokashi College of Food Technology Rajmachi Karad. https://mokashipratishthan.org/wp_mokashi/index.php/2023/10/21/on-the-occasion-of-world-food-day-on-16-10-2023-we-organize-competitions-for-all-food-technology-students-at-dadasaheb-mokashi-college-of-food-technology-rajmachi-karad/ Sat, 21 Oct 2023 10:02:47 +0000 https://mokashipratishthan.org/wp_mokashi/?p=958 Read More ...]]> On the occasion of World Food Day on 16/10/2023 we organize competitions for all food technology students at Dadasaheb Mokashi College of Food Technology Rajmachi Karad. In this competition Poster presentation, Innovative food product development competition, Quiz competition are included. These competition are held to develop soft skills within the students and to encourage innovative ideas and knowledge of students and also to explore the talent of students to extracurricular activities.

]]>
दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी 12 वन बंधारे बांधले https://mokashipratishthan.org/wp_mokashi/index.php/2023/10/21/vanbandhare-2023/ Sat, 21 Oct 2023 09:56:48 +0000 https://mokashipratishthan.org/wp_mokashi/?p=942 Read More ...]]>

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, व कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला या सप्ताह अंतर्गत राजमाची येथील वनपरिक्षेत्र व सदाशिवगड पायथ्याशी अशी एकूण १२ वनबंधारे बांधण्याचे काम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव निरीक्षण सहल प्रा. एम. बी. दुर्गावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करून विद्यार्थ्यांच्या विषयाशी निगडित विविध वनस्पतींच्या प्रजातीची ओळख व माहिती दिली राजमाची चे कृषी सहाय्यक यांच्या मार्गदर्शनाखाली वनबंधारे बांधण्यात आले. 

राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी श्रमदान केले याबद्दल मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव श्री. अभिजीत मोकाशी साहेब उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी साहेब व संचालक श्री विलास चौधरी सर यांनी प्रोत्साहन देऊन प्राचार्य डॉ. के. एस. घुटुकडे, डॉ. पी. पी. पाटील व प्रा. ए. एस. ढाणे यांच्या सहकार्याने १२ वनबंधारे बांधण्यासाठी परिश्रम घेतले.

]]>