स्व. दादासाहेब उर्फ भगवानराव मोकाशी यांची १९ वी पुण्यतिथी

मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये बुधवार दिनांक १९ जुन, २०२४ रोजी स्व. दादासाहेब उर्फ भगवानराव मोकाशी यांची १९ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठानचे सचिव श्री. अभिजित मोकाशी, उपाध्यक्ष डॉ. विश्वजित मोकाशी, संचालक श्री. विलास चौधरी, विविध घटक महाविद्यालयांचे प्राचार्य ए. एस. ढाने, डॉ. के . एस. घुटुकडे, डॉ. पी. पी. पाटील, प्रा. एस. ई. जगताप, प्रा. डी. एस. सुर्यवंशी, प्रा. एस. एस. पवार, सर्व घटक महाविद्यालयांचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रतिष्ठानचे संचालक श्री. विलास चौधरी यांनी आपल्या शब्दसुमनाने स्व. दादासाहेब मोकाशी साहेबांच्या आठवनीना व विचारांना उजाळा देऊन उपस्थितांमध्ये कुतूहल निर्माण केले. त्याचबरोबर प्रा. ए. एस. ढाणे यांनी स्व. दादासाहेब मोकाशी साहेबांचा शैक्षणिक संकुलातील कार्याचा आढावा घेतला तर कार्यक्रमाचे आभार डॉ. के. एस. घुटुकडे यांनी मांडले.