शैक्षणिक दौरा -2024-2025
मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी सलग्न दादासाहेब मोकाशी कृषि अभिांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील प्रथम वर्ष, व्दितीय वर्ष व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दौरा दिनांक 11 डिसेंबर, २०२४ व 12 डिसेंबर, २०२४ या कालावधीत सह्याद्री साखर कारखाना, सहयाद्री ट्रॅक्टर गॅरेज, तासवडे एमआयडीसी, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प टप्पा १ व २, शिवणी गावातील ठिबक सिंचन ऑटोमायझेशन प्लांट, इत्यादी ठिकाणी भेटी देऊन विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखविले, विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली,तसेच विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली, यासाठी संचालक श्री विलास चौधरी यांच्या प्रोत्साहनाने, प्राचार्य डॉ. पी. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली , टूर प्रमुख प्रा. एस. एस. अगाने, टूर समन्वयक प्रा. ओ. एस. माने यांच्या सहकार्याने पार पडली.