जयंत फाऊंडेशन (मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान राजमाची 2017 बॅच माजी विद्यार्थी) तर्फे आज कोळे तालुका- कराड, जिल्हा- सातारा, येथील जिजाऊ बहुउद्देशीय संस्था व वसतिगृह येथील 35 अनाथ व गरजू मुलांना एक मदतीचा हात म्हणून मदत व सस्नेह मेळावा आयोजित करण्यात आला या वेळी येथील मुलांना झोपण्यासाठीचे पत्रा शेड करून देणे, त्या मुलांना प्रोटिन युक्त आहार मिळवा या साठी धान्य, कडधान्य, किराणा व अल्पोपाहार देण्यात आला. या वेळी दादासाहेब मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान चे संचालक मा. विलास चौधरी सर, अन्न तंत्रज्ञान विभागाचे प्राचार्य प्रा. डॉ. ढाणे सर, कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्राचार्य डॉ. प्रा. पाटील सर, कृषी पदवीधर युवाशक्ति संघटना, महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष जयदीप ननवरे, कृषी पदवीधर युवाशक्ति संघटना मराठवाडा कार्याध्यक्ष धवलसिंह लावंड, जिजाऊ वसतिगृह संस्थापक अध्यक्ष समीर नदाफ सर, उद्योजक मनोज डुबल, अभिजित डुबल, सामाजिक कार्यकर्ते गणेश शिंदे, प्राध्यापक किरण पाटील सर, व फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते. जयंत फाऊंडेशन नेहमी समाजातील दुर्बल घटकांसाठी शाश्वत काम करण्यासाठी प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन या वेळी संस्थेच्या सदस्यांनी केले.