श्री. अभिजीत मोकाशी व डॉ. विश्वजीत मोकाशी यांना आदर्श शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार 2023 प्रदान

एकात्मिक सामाजिक कल्याण सोसायटी, राष्ट्रीय ग्रामीण विकास फाउंडेशन आधार बेळगावी व गोवा हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 26 मार्च 2023 रोजी गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन हरमल गोवा याठिकाणी *राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा* पार पडला. गोवा, दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात राज्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना प्रदान करण्यात आला यावेळी *मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव श्री. अभिजीत मोकाशी व डॉ. विश्वजीत मोकाशी* यांना *आदर्श शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार 2023* *सन्मानचिन्ह, विशेष प्रमाणपत्र, म्हैसूर फेटा, चंदनाचा कायमस्वरूपी हार, माननीय केंद्रीय मंत्राकडून भारत सरकारचे अभिनंदन पत्र* या स्वरूपात विविध मान्यवरांच्या उपस्थित प्रदान करण्यात आला यावेळी मा. वीरप्पा मोईली मा. केंद्रीय कायदामंत्री, भारत सरकार व मा. मुख्यमंत्री कर्नाटक सरकार, मा. लक्ष्मण पार्सेकर मा. मुख्यमंत्री गोवा सरकार, श्रीमती रत्नमाला सावनुर केंद्रीय मंत्री भारत सरकार, बॅरिस्टर श्री. अमरसिंह पाटील मा. खासदार बेळगाव, श्री. राजू शिंगाडे साहेब मा. महापौर कोल्हापूर महानगरपालिका, महाराष्ट्र सरकार, श्री. अरविंद घट्टी मा. जिल्हा कमांडर, होमगार्ड डिपार्टमेंट कर्नाटक सरकार, मा. कोमल शर्मा फाउंडेशन चेअरमन जयपुर, गुजरात राज्य, मा. जयराज लोंढे विशेष अभियंता राज्य दिल्ली, श्री. महेश मेघनावर जिल्हा पोलीस प्रमुख (अतिरिक्त) एस.पी. बिदर कर्नाटक सरकार.

          या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी भारतीय सैन्य दलातील अधिकारी, सिने कलाकार शिक्षण अधिकारी, राजकीय नेते व मठाधीश यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.

         या पुरस्कार वितरण सोहळ्या दरम्यान मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे *संचालक श्री. विलास चौधरी* यांनी श्री. अभिजीत मोकाशी व डॉ. विश्वजीत मोकाशी यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर अभिमानास्पद पुरस्काराबद्दल दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलातील सर्व घटक महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.