दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामधील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा खो – खो चा संघ सुवर्णपदक प्राप्त करत प्रथम क्रमांक पटकावला

मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी सलग्न दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामधील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा *खो – खो* चा संघ *लोकमंगल कृषि महाविद्यालय, वडाळा* याठिकाणी शुक्रवार दिनांक १५ सप्टेंबर,२०२३ व शनिवार दिनांक १६ सप्टेंबर, २०२३ रोजी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेसाठी सहभागी झाला होता यामध्ये मुलींच्या संघाने कृषि महाविद्यालय पुणे च्या संघास पराजित करून ट्रॉफी, प्रशस्तीपत्र व सुवर्णपदक प्राप्त करत *प्रथम क्रमांक* पटकावला तर मुलांच्या संघाने श्रीराम कृषि महाविद्यालय पानिव संघास पराजित करून ट्रॉफी, प्रशस्तीपत्र व रौप्य पदक प्राप्त करत *द्वितीय क्रमांक* पटकावला त्याबद्दल सर्व विजयी स्पर्धकांचे अभिनंदन संस्थेचे सचिव श्री अभिजित मोकाशी साहेब, उपाध्यक्ष डॉ. विश्वजित मोकाशी साहेब व संचालक श्री विलास चौधरी सर यांनी केले यावेळी सर्व घटक महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. विजयी संघास स्पोर्ट ऑफिसर *एस. एस. निकम, प्रा. वाय. सी. माने, कोच मनीषा बोंडवे व संदेश पवार* यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.