महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, व कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला या सप्ताह अंतर्गत राजमाची येथील वनपरिक्षेत्र व सदाशिवगड पायथ्याशी अशी एकूण १२ वनबंधारे बांधण्याचे काम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव निरीक्षण सहल प्रा. एम. बी. दुर्गावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करून विद्यार्थ्यांच्या विषयाशी निगडित विविध वनस्पतींच्या प्रजातीची ओळख व माहिती दिली राजमाची चे कृषी सहाय्यक यांच्या मार्गदर्शनाखाली वनबंधारे बांधण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी श्रमदान केले याबद्दल मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव श्री. अभिजीत मोकाशी साहेब उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी साहेब व संचालक श्री विलास चौधरी सर यांनी प्रोत्साहन देऊन प्राचार्य डॉ. के. एस. घुटुकडे, डॉ. पी. पी. पाटील व प्रा. ए. एस. ढाणे यांच्या सहकार्याने १२ वनबंधारे बांधण्यासाठी परिश्रम घेतले.