दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी

महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी सलग्न व मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी के के वाघ कृषी महाविद्यालय व इतर घटक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेमध्ये *वैभवी पवार, सिद्धेश दरेकर, सानिका पवार, कृष्णाजी जाधव, सुजय इंगवले, शिवम शिंदे, विशाल पाटील, क्षितिज जाधव, सिद्धी गायकवाड, राजवर्धन देवकर* या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून विविध विषयावरती सर्वोत्कृष्ट माहितीद्वारे लक्षवेधून घेतले.

आयोजित आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा २०२३-२०२४ मध्ये *वैभवी शिवाजी पवार* या विद्यार्थिनीने लोकसंख्या व पर्यावरण या वादविवाद विषयावरती तसेच भारतीय लोकशाही या वक्तृत्व स्पर्धेमध्ये *द्वितीय पारितोषिक* पटकावले तसेच *इतर विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र* देऊन गौरवण्यात आले याबद्दल मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठानचे सचिव श्री. अभिजीत मोकाशी, उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी, संचालक श्री. विलास चौधरी यांनी अभिनंदन केले तसेच कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. घुटूकडे व इतर घटक महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.