दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयाची आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत सुवर्ण पदक

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न व मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयाची आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत सुवर्ण पदक
 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी  अंतर्गत व डॉ. आर. एस. गुंजाळ वेलफेयर फाउंडेशन संचलित कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर बिजनेस मॅनेजमेंट, गुंजाळवाडी येथे आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धा सोमवार दिनांक 31 ऑक्टोबर, 2022 ते 02 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत पार पडल्या. आयोजित क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चे शिक्षण संचालक व तथा अधिष्ठाता मा. डॉ. प्रमोद रसाळ, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीर सिंग चौहान , क्रीडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड डॉ. आर. एस. गुंजाळ वेल्फेअर फाउंडेशन चे संचालक मा. डॉ. राधेश्याम गुंजाळ व संस्थेचे सचिव मा.  राहुल गुंजाळ यांच्या हस्ते झाले. सदर स्पर्धेमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असणाऱ्या 19 महाविद्यालयातील एकूण 34 मुली व मुलांच्या संघांनी सहभाग नोंदवला. सदर स्पर्धेमध्ये दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील मुलींच्या संघाने  अटीतटीच्या सामन्यांमध्ये पात्रता फेरीत प्रवेश करून इतर संघांवर मात करत प्रथम पारितोषिक पटकावले. या सर्व  खेळाडूंना महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. एस. एम. शिंदे, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. एस. एस. निकम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या संघांना संगमनेर तालुक्याचे गटविकास अधिकारी मा. अनिल नागणे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड यांच्या हस्ते मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पारितोषिक प्रदान करून गौरविण्यात आले.
विजेत्या खो- खो संघातील सर्व खेळाडूंचे मनोबल उंचवण्यासाठी व पुढील यशस्वी कामगिरीसाठी संस्थेचे सचिव श्री अभिजीत मोकाशी, उपाध्यक्ष डॉ विश्वजीत मोकाशी व संचालक श्री विलास चौधरी यांनी अभिनंदन करून प्रोत्साहन दिले. तसेच दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलातील सर्व घटक महाविद्यालयातील प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.