मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान अंतर्गत दादासाहेब मोकाशी अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, दादासाहेब मोकाशी कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, दादासाहेब मोकाशी तंत्रनिकेतन, दादासाहेब मोकाशी औदयोगिक प्रशिक्षण संस्था, वेस्टफिल्ड ज्यनिअर ऑफ सायन्स कॉलेज, मोकाशी एज्युकेअर आणि क्षिक्षणमहर्षी दादासाहेब मोकाशी कौशल्य विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 06 डिसेंबर 2022 रोजी स्व. दादासाहेब मोकाशी यांची 73 वी जयंती शैक्षणिक सकुंलामध्ये साजरी करण्यात आली. यावेळी 8 वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व, निबंध लेखन आणि चित्रकला स्पर्धा तसेच रक्तदान शिबीर व पुरुष खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
आयोजित विविध उपक्रमांची सुरूवात स्व. दादासाहेब मोकाशी यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. संगिता साळुंखे माई चॅरिटेबल ट्रस्ट, किवळ, प्रमुख पाहुण्या सोनल भोसेकर अध्यक्षा उद्योगिनी फाऊंडेशन, प्रमुख वक्ते डॉ. विनोद बाबर व्यवस्थापकीय संचालक कृष्णा फाऊंडेशन, श्री. बाबासाहेब कदमसो चेअरमन जिल्हा दुध संघ सातारा व संचालक किसनवीर साखर कारखाना, श्री. सतिश मोरे, श्री. प्रविण पाटील अध्यक्ष सातारा तालुका केमिस्ट असो., श्री. सुनिल पाटील माजी उपाध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती कराड, सौ. मनिशा साळुंखे माई चॅरिटेबल ट्रस्ट, श्री. पांडुरंग पाटील, श्री. विजय पाटील, शिवाजीराव डुबल सरपंच राजमाची, श्री नारायणराव कदम, समाजसेवक सातारा, श्री. महेश घाडगे, श्री. प्रकाश पिसाळ, श्री. विजय पाटील व अदि मान्यवर विविध शाळांचे शिक्षक प्रतिनिधी, विद्यार्थी व विद्यार्थींनी उपस्थित होते.
डॉ. विनोद बाबर यांनी यशाचा शिवयंत्र यावर समुपदेशन करत अनेक दाखले दिले तर सौ. सोनल भोसेकर यांनी भविष्यामध्ये महिला व सर्व विद्यार्थी यांनी नोकर न बनता उद्योजक बनण्याचे आवाहन केले तर अध्यक्षीय भाषणामध्ये सौ. संगिता सांळुखे यांनी प्ररेणादायी प्रार्थनेमार्फत विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची अपेक्षा व्यक्त करून सहभागी स्पर्धकांची आणि आयोजकांचे कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी एकूण 65 शाळांमधून 1100 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्याचबरोबर पुरुष खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी एकूण 18 विविध भागातील संघांनी सहभाग नोंदवला यामध्ये प्रथम पारितोषिक इस्लामपूर संघाने पटकवले तर उपविजेते पद कोल्हापूर संघाने मिळवले तिस-या व उत्तेजनार्थ स्थानावर अनुक्रमे उंब्रज व सातारा संघ राहिले सर्व विजेत्या संघांना संस्थेच्या वतीने मानचिन्ह रोख रक्कम देऊन
अभिनंदन
केले.
आयोजित कार्यक्रमासाठी मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव श्री. अभिजीत मोकाशी, उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी, संचालक श्री. विलास चौधरी, मार्गदर्शिका सौ. पुष्पा चौधरी उपस्थित होते त्याचबरोबर घटक महाविद्यालयांचे प्राचार्य प्रा. ए.एस.ढाणे, डॉ. एस. एम. शिंदे, प्रा. एस. ई. जगताप, डॉ. पी.पी. पाटील, प्रा. सौ. एस.एम. पवार, प्रा. डी. एस. सुर्यवंशी प्रा. एस.एन. सुर्यवंशी, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. एस.एन. सुर्यवंशी व प्रा. व्हि.व्हि. माने यांनी केले.