दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांची विविध उपक्रमांना भेटी

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयातील सत्र ०३ व ०८ तसेच दादासाहेब मोकाशी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयातील सत्र ०३ मधील विद्यार्थ्यांनी शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी शैक्षणिक अभ्यासांतर्गत विविध उपक्रमांना भेटी दिल्या
यावेळी बारामती येथील कृषीक 2023 या भारतातील सर्वात मोठ्या प्रात्यक्षिक आधारित कृषी प्रदर्शनास भेट देऊन कृषी मधील सुधारित तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली त्याचबरोबर राष्ट्रीय कृषी ताण व्यवस्थापन संस्था (NIASM) या ठिकाणाहून कृषी वरती परिणाम करणाऱ्या वातावरणातील, पाण्यातील, मातीमधील तानाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून आवश्यक आव्हानात्मक संशोधनाची माहिती घेतली त्याचबरोबर टाकेवाडी गावातील पानलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत दुष्काळ निवारणा संदर्भातील विविध उपक्रम प्रत्यक्षात पाहिले.
विद्यार्थ्यांची कृषी क्षेत्रातील विविध उपक्रमांची माहिती होण्यासाठी आयोजित भेटीसाठी मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव श्री अभिजीत मोकाशी, उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी व संचालक श्री विलास चौधरी यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले. त्याचबरोबर प्रा. ए. एस. ढाने, प्रा. डॉ. एस. एम. शिंदे, प्रा. व्ही. टी. बागल, डॉ. व्हि. आर. जगदाळे, प्रा. जाधव, प्रा. मलकमिर व इतर शिक्षकांच्या सहकार्याने यशस्वी भेटी देण्यात आल्या.