दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

कृषी विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, आयटीआय, पॉलिटेक्निक व वेस्टफिल्ड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये 74 वा प्रजासत्ताक दिन गुरुवार दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी संस्थेचे सचिव मा. श्री अभिजीत मोकाशी साहेब यांच्या हस्ते व सर्व घटक महाविद्यालयांचे प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
  प्रजासत्ताक दिनानिमित्त कृष्णाजी जाधव या विद्यार्थ्याने मान्यवरांचे स्वागत ध्वज पूजन व ध्वजारोहण त्याचबरोबर राष्ट्रगीत व झेंडा गीतासाठी संयोजन केले.  सुशांत कदम व धनंजय पुजारी या विद्यार्थ्यांनी झांज पथक व संचलन याचे संयोजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मनोगत प्राध्यापक दुर्गावळे यांनी केले त्याचबरोबर कौस्तुभ जोशी, मयुरी देसाई या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तसेच ओंकार गावडे या विद्यार्थ्याने आपले मनोगत व संविधान प्रतिज्ञा दिली. निकिता पवार या विद्यार्थिनीने संदेसे आते है हे देशभक्तीपर गीत गायले. यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
 मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलामध्ये 74 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे सचिव श्री अभिजीत मोकाशी डॉ. विश्वजीत मोकाशी व संचालक श्री. विलास चौधरी यांनी ध्वजवंदन करून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व घटक महाविद्यालयांचे प्राचार्य ए. एस. ढाणे, डॉ. एस. एम. शिंदे डॉ. पी. पी. पाटील, प्रा. एस. इ. जगताप, प्रा. एस. एस. कदम, प्रा. एस. एन. सूर्यवंशी, प्रा. डी. एस. सूर्यवंशी तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी या राष्ट्रीय उत्सवामध्ये सहभाग घेऊन ध्वजवंदन केले.